नांदगांव : प्रतिनिधी
शहरातील भोंगळे रस्त्यालगत आमदार सुहास कांदे यांच्या निधीतून होलार समाजासाठी व्यायामशाळा व सभागृह मंजूर करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन आ.कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुम कांदे यांचे हस्ते करण्यात आले.
नांदगाव शहर व परिसरातील होलार समाज तरुणांच्या मागणीनंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ समाजातील तरुणांकरिता व्यायामशाळा व सभागृह मंजूर केले. तरुण पिढीने व्यसनाकडे न वळता व्यायाम करावा या उद्देशाने मतदारसंघात अनेक ठिकाणी व्यायाम शाळा बांधून देण्यात आले आहेत.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अमोल नावंदर,माजी नगरसेवक नंदू पाटील,शहर अध्यक्ष सुनील जाधव,सौ.रोहिणी मोरे,रामनिवास करवा, विजय चोपडा,भगवान सोनावणे,रवी सोनावणे,रोहिदास सोनावणे, नामदेव सोनावणे, पंडित गेजगे, संजय गेजगे,शिरूभाऊ शेलार, पप्पू सोनावणे,पप्पू जाधव,नितीन सोनावणे, बापू जाधव, सागर सोनावणे,सर्वेश्वर हातेकर, बिरू जाधव,जय जाधव,आदिंसह मोठ्या प्रमाणात नागरिक,समाज बांधव उपस्थित होते.

मनमाड महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...