loader image

नांदगाव च्या अलका नारायणे वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड ने सन्मानित

Mar 11, 2024


नांदगाव ( प्रतिनिधी) दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवाॅर्ड 2024 राष्ट्रीय पुरस्काराने रविवार दि.10 मार्च नाशिक येथील पलाश सभागृह गुरुदक्षिणा हाॅल , काॅलेज रोड येथे दुपारी अडिच ते पाच वाजताच्या दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ.अलका नारायणे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील वुमेन रायझिंग स्टार अवाॅर्ड 2024 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नाशिक येथील कर्तव्यदक्ष
पोलिस उपायुक्त कविता राऊत,नाळ चित्रपटाच्या लोकप्रिय नायिका अभिनेत्री देविका दप्तरदार, विशेष इंडिया इंटरनॅशनल 2024 विजेत्या ज्योती शिंदे, ग्राहक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आशा पाटील, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण समितीच्या सदस्या सायली पालखेडकर,लोक भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशीताई अहिरे,पर्यावरण रक्षण कार्य करणारे मंत्राने ग्रिन रिसोर्स चे अध्यक्ष डॉ. यु.के.शर्मा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये सौ.ऋतुजा हर्षद नारायणे यांना मनाली,केरळा, काश्मीर, बॅंकाॅक साठी तीन दिवसांचे काॅम्पलेमेंटरी हाॅलीडे गिफ्ट व्हाउचर सन्मान पुर्वक देण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.