loader image

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळावा उत्साहात संपन्न

Mar 11, 2024



सौ अंजुम ताई सुहास कांदे यांनी नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी मोठ्या संख्येने विविध गावातील महिलांनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद घेतला.
      या वेळी विवाहित स्त्री ने मॉडर्न होऊन पतीच्या पुढे जाण्यापेक्षा पतीच्या खांद्याला खांदा लावून कुटूंबाच्या सुखासाठी,प्रगतीसाठी साथ दिली पाहिजे.आणि त्यासाठी आपले आमदार सुहास अण्णा व मी तुम्हाला मदत करणार आहोत.असे प्रतिपादन समाजसेविका सौ.अंजुम सुहास कांदे यांनी केले.
    जागतिक महिला दिन निमित्ताने मतदार संघातील महिलांना व त्यांच्या कुटंबातील सदस्याच्या सुखशांतीसाठी खास उज्जैन येथून सिद्ध करून आणलेल्या रुद्राक्ष वाटप करण्यात आले. तसेच मोफत शासकीय सुविधा कॅम्पच्या माध्यमातून आलेल्या जातीचे दाखल्यांची  प्रकरणांचे पूर्तता करत दाखल्यांची वाटप करण्यात आली
     त्या पुढे म्हणाल्या की,आधुनिक पद्धतीचा अवलंब करून अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्यापेक्षा देवाने आपल्याला ज्या उद्देशाने जन्माला घातले आहे.ते उद्दिष्ट पूर्ण करणे होय.स्त्री ला ईश्वराने ज्या – ज्या देणग्या दिल्या आहेत.त्या पुरुषाला दिल्या नाहीत.म्हणजेच आपण स्पेशल आहोत.याची जाणीव ठेवून आपण राहिले पाहिजे.आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या कुटंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लावावा.असा उद्योग येत्या काही दिवसात आमदार अण्णा व मी सुरु करणार आहोत,आणि यासाठी शासनाची कुठलीही मदत न मागता स्वखर्चाने या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणार आहोत.असे ही सौ.कांदे शेवटी म्हणाल्या.
    याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.श्रद्धाताई कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख सौ.उज्वला ताई खाडे, तालुकाप्रमुख विद्याताई जगताप,सौ.रोहिणी मोरे,सौ.संगीता बागुल,पूजा छाजेड,अश्विनी पाटील,मनीषा इंगळे,भारती फुके,निर्मला वाघ,तबसूम शेख,माया शेळके,निशा चव्हाण,रेणुका बाहीकर, भारती बागोरे,जान्हवी शर्मा,जयश्री डोळे,नेहा कोळगे, आदिंसह शेकडो महिला उपस्थित होत्या.सूत्रसंचालन व प्रास्तविक अँड.विद्या कसबे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.