नांदगाव तालुका तसेच विधानसभा मतदारसंघातील विविध गावात भगवान विर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सौ. अंजुमताई कांदे यांनी विविध गावांमध्ये जयंती उत्सवास उपस्थिती लावली.
आज महाशिवरात्री, जागतिक महिला दिन,आणि वीर एकलव्य महाराज यांची जयंती असा सुवर्णं योग जुळून आला आणि त्या निमित्ताने आज पुन्हा तुमच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली. हे आमचे भाग्य आहे. असे मनोगत सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी मनोगत व्यक्त केले.
सोयगाव,हिसवळ खुर्द, चोंढी जळगाव, सावकारवाडी,वऱ्हाणे, येथे वीर एकलव्य महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना सौ.कांदे यांनी आमदार सुहास कांदे यांनी मतदार संघात केलेल्या कामांचा उल्लेख आपल्या भाषणातून केला.त्यात करंजवन पाणी योजना,७८ खेडी पाणी योजना,मनमाड औद्योगिक वसाहत,नांदगाव स्वतंत्र पाणी पुरवठा योजना,आणि भविष्यात महिलांसाठी घरपोह्च उद्योग आणि शेती सिंचनासाठी शाश्वत पाणीपुरवठा,यासह नागरिकांना सध्या ज्या आरोग्य,शिधापत्रिका, शासकीय कागदपत्रे,अशा मूलभूत गरजा ही आमदार सुहास अण्णा पूर्ण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.विद्या जगताप,सौ.संगीता बागुल, रोहिणी मोरे, सौ.मायाताई खाडे, धनंजय कांदे,मनमाड बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकडे, नागापूर चे सरपंच राजेंद्र पवार,शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष महेंद्रनाना दुकले,उपसरंपच संजय आहेर,कैलास फुलमाळी,सरपंच समाधान व्हडगळ,संतोष सोनावणे,पोपट आहेर,संदीप आहेर,विजय आहेर,गंगाराम पवार,सुमन खुरसने,नंदा सोनावणे,रेखा वाघ,आशाबाई आहिरे,सरपंच भरत पवार, आदिंसह शेकडो ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


