नांदगाव : मारुती जगधने २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली जातील असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला. नांदगाव शहरातील जुने रेल्वेफाटक नं ११३ पासून ते गंगाधरी पर्यंत ची दिड कि.मी. वरील अतिक्रमणे जमिनदोस्त होणार असल्याने अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकांम विभाग नांदगाव यांनी ७ मार्च २०२४ रोजी अतिक्रमण धारकाना नोटीस बजावून २४ तासाच्या आता अतिक्रमणे काढण्याचे फर्माण केले आहे .
नांदगाव येवला रोडवरील गंगाधरी ते जुना रेल्वेगेट पर्यंत ची अतिक्रमणे काढण्याची नोटीस बजावल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे .चांदवड नांदगाव मनमाड ४० गांव राज्यमार्ग २४ लगत सा.क्र. ०/००ते १:५०० मध्ये रस्त्यालगत डाव्या उजव्या बाजूला असलेली विविध व्यवसायाची दुकाने टपरी अनधिकृतपणे केलेली अतिक्रमणे काढण्या संदर्भात नोटिसा बजावल्याने दि १३ मार्च रोजी सदर अतिक्रमणे काढण्याचे काम चालू होते अतिक्रमण धारक स्व:त ही अतिक्रमणे काढण्याचे चालु केले आहे दरम्यान शहरातील अनेक अतिक्रमणे रस्त्यालगत संपूर्ण शहरात आहे आणी फक्त रेल्वेफाटक ते गंगाधरी याच दरम्यान दिड किमी वरील अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा जाणीव पूर्वक बजावल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर केला आहे.
प्रतिक्रिया : अधिकार्यानी दबावतञ वापरून जबरदस्ती अतिक्रमणे काढली जात आहे २४ तासात खाली करण्याचे सक्तीने बजावले असून शहरात सर्वच रस्त्यावर अतिक्रमणे आहेत फक्त रेल्वेफाटका जवळचीच का काढ्याचे नोटिसा? शहरात देखील पाय ठेवायला जागा नाही .एखादी विपरीत घटना घडली तर अग्नीशमन दलाची गाडी शहरात जाईल का अग्नीशमन दलाच्या गाडीचे शहरात प्रात्येक्षिक करण्यात यावे : विश्वास अहिरे माजी नगरसेवक नांदगाव

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट
दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब...