Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

Mar 13, 2024




नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली जातील असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला.  नांदगाव शहरातील जुने रेल्वेफाटक नं ११३ पासून ते गंगाधरी पर्यंत ची दिड कि.मी. वरील  अतिक्रमणे जमिनदोस्त होणार असल्याने अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले  आहे.

उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकांम विभाग नांदगाव यांनी ७ मार्च २०२४ रोजी अतिक्रमण धारकाना नोटीस बजावून २४ तासाच्या आता अतिक्रमणे काढण्याचे फर्माण केले आहे .
नांदगाव येवला रोडवरील गंगाधरी ते जुना रेल्वेगेट पर्यंत ची अतिक्रमणे काढण्याची नोटीस बजावल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे .चांदवड नांदगाव मनमाड ४० गांव राज्यमार्ग २४ लगत सा.क्र. ०/००ते १:५०० मध्ये रस्त्यालगत डाव्या उजव्या बाजूला असलेली विविध व्यवसायाची दुकाने टपरी अनधिकृतपणे केलेली अतिक्रमणे काढण्या संदर्भात नोटिसा बजावल्याने दि १३ मार्च रोजी सदर अतिक्रमणे काढण्याचे काम चालू होते अतिक्रमण धारक स्व:त ही अतिक्रमणे काढण्याचे चालु केले आहे दरम्यान शहरातील अनेक अतिक्रमणे रस्त्यालगत संपूर्ण शहरात आहे आणी फक्त रेल्वेफाटक ते गंगाधरी याच दरम्यान दिड किमी वरील अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा जाणीव पूर्वक बजावल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर केला आहे.
प्रतिक्रिया : अधिकार्यानी दबावतञ वापरून जबरदस्ती अतिक्रमणे काढली जात आहे २४ तासात खाली करण्याचे सक्तीने बजावले असून शहरात सर्वच रस्त्यावर अतिक्रमणे आहेत फक्त रेल्वेफाटका जवळचीच का  काढ्याचे नोटिसा? शहरात देखील पाय ठेवायला जागा नाही .एखादी विपरीत घटना घडली तर अग्नीशमन दलाची गाडी शहरात जाईल का अग्नीशमन दलाच्या गाडीचे शहरात प्रात्येक्षिक करण्यात यावे :  विश्वास अहिरे माजी नगरसेवक नांदगाव

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]