loader image

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

Mar 15, 2024


मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद जडला आहे. काही काळापासून तरुणाईला गिर्यारोहणाची भुरळ पडली आहे.

कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मनमाड शहरात कबड्डी, पाठोपाठ शरीर सौष्ठव, वेटलिफ्टिंग, क्रिकेट, सायकलिंग, आदि खेळांकडे तरुणाई आकर्षित होत होती; पण आता गिर्यारोहण या साहसी खेळात मनमाडचे तरुण सहभागी होताना दिसतायेत, तरुणच नव्हे तरुणीना देखील साहसी खेळाचे वेड लागले आहे.

शहरातील नावाजलेले कबड्डीपटू स्व. अशोक गायकवाड यांची कन्या प्रेरणा हिने पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलींग या साहसी क्रिया पॉइंट आडवेंचर यांच्या माध्यमातन केले.

राज्यभरातील गिर्यारोहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली ही मोहीम मनमाड च्या कन्येने जिद्दीने पूर्ण करत शहराचा नावलौकिक वाढविला. शहरात या साहसी क्रीडा प्रकाराबद्दल कोणतेही अधिकृत प्रशिक्षणाची सोय नसताना देखील तिने यश संपादन केले आहे.

शहरातील तरुणाई परिसरातील अनेक डोंगर माथ्यांवर
गिर्यारोहण मोहिमेदरम्यान हे तरुण कचरा, प्लास् टिक, आदी गोळा करून पर्यावरण रक्षण व स्वच्छता मोहीम राबवतात.

जुन्नर तालुक्यातील या मोहिमेत प्रेरणासोबत, प्रतीक संजय दराडे, प्रमिल शेंडगे, रमेश पटेल, रोशन खिवां सरा भारत खिंवसरा यांनी सहभाग घेतला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.