Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

Mar 15, 2024

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद जडला आहे. काही काळापासून तरुणाईला गिर्यारोहणाची भुरळ पडली आहे.

कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मनमाड शहरात कबड्डी, पाठोपाठ शरीर सौष्ठव, वेटलिफ्टिंग, क्रिकेट, सायकलिंग, आदि खेळांकडे तरुणाई आकर्षित होत होती; पण आता गिर्यारोहण या साहसी खेळात मनमाडचे तरुण सहभागी होताना दिसतायेत, तरुणच नव्हे तरुणीना देखील साहसी खेळाचे वेड लागले आहे.

शहरातील नावाजलेले कबड्डीपटू स्व. अशोक गायकवाड यांची कन्या प्रेरणा हिने पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलींग या साहसी क्रिया पॉइंट आडवेंचर यांच्या माध्यमातन केले.

राज्यभरातील गिर्यारोहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली ही मोहीम मनमाड च्या कन्येने जिद्दीने पूर्ण करत शहराचा नावलौकिक वाढविला. शहरात या साहसी क्रीडा प्रकाराबद्दल कोणतेही अधिकृत प्रशिक्षणाची सोय नसताना देखील तिने यश संपादन केले आहे.

शहरातील तरुणाई परिसरातील अनेक डोंगर माथ्यांवर
गिर्यारोहण मोहिमेदरम्यान हे तरुण कचरा, प्लास् टिक, आदी गोळा करून पर्यावरण रक्षण व स्वच्छता मोहीम राबवतात.

जुन्नर तालुक्यातील या मोहिमेत प्रेरणासोबत, प्रतीक संजय दराडे, प्रमिल शेंडगे, रमेश पटेल, रोशन खिवां सरा भारत खिंवसरा यांनी सहभाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]