आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दगडवाडी व तीन वाड्या या वस्तीसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ५२ लाख रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून,आज त्या कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे व किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
आ.श्री.कांदे यांनी ग्रामीण भागातील छोटया -छोट्या वाड्या – वस्त्यांवरील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे होणारे हाल बघून या सर्व वस्त्यांसाठी जलजीवन योजनेअंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत.या योजनांमुळे सदर वस्तीवरच्या ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारी फरफट कायमची थांबणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी सरपंच सौ.वंदना दुरडे, मजूर संस्थेचे संचालक प्रमोद भाबड,बाजार समितीचे संचालक सतिश बोरसे,भावराव बागुल,शशी सोनावणे,दिपक शेलार, शरद सोनावणे,संजय आहिरे,बाळू दुरडे,एकनाथ मोरे,दत्तू निकम,बालक बोरसे,शरद बोरसे,बाळू सुरसे,विश्वनाथ बोरसे,विजय साधने,सुभाष मुकणे,सुदर्शन निकम,नंदू मुकणे,आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.