Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राज्यातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार – दीपक केसरकर

Mar 16, 2024

राज्य सरकारने राज्यातील सर्व सर्व शाळांच्या शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षकांसाठी आता ड्रेस कोड लागू होणार आहे. नव्या नियमानुसार शाळेत आता शिक्षकांना टी-शर्ट किंवा जीन्स पँट परिधान करून येता येणार नाही. त्याचप्रमाणे जसं डॉक्टरांच्या नावामागे Dr. लावतात, वकिलांच्या नावामागे Adv लावतात त्याचप्रमाणे आता शिक्षकांच्या नावामागे Tr.  लावले जाणार आहे. ही घोषणा राज्याच्या शिक्षण खात्याने केली आहे.

शिक्षकांच्या नावामागे  मराठीमध्ये टी असं लिहिण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. नावामागे Tr अक्षर लागल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक हे त्यांच्या  नावानेच ओळखले जाणार आहेत. शिक्षकांच्या नावावरुनच आता वकील व डॉक्टरांप्रमाणे त्यांचे प्रोफेशन समजणार आहे.

राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोड लागू केल्यानंतर महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव करावा लागणार आहे. तर पुरूष शिक्षकांना गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन केलेला असावा.

सरकारने केवळ कपडेच नाही तर महिला व पुरुष शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या चप्पल घालाव्यात याबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे. या शासन पत्रकात शिक्षकांनी कुठले बूट घालावेत. कशा चपला घालाव्यात महिला शिक्षकांच्या चपला कशा असाव्यात याबाबत नियमावली देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांसाठी संबंधित शाळा ड्रेसकोडचा रंग निश्चित करेल. त्यानंतर या ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक राहील असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]