loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

Mar 16, 2024



नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६० किलो स्नॅच ७५ किलो क्लीन जर्क १३५ किलो वजन उचलून आकांक्षा किशोर व्यवहारे हिने युथ ज्युनियर व सीनियर तिन्ही गटामध्ये तीन सुवर्णपदके  तसेच ४५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले आहे. आकांक्षा सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेत असून छत्रे विद्यालयात ११ वी सायन्स ला शिकत आहे.
आकांक्षा ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ  विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा,  प्रा दत्ता शिंपी, छत्रे  विद्यालयाचे  आधारस्तंभ पी जी  धारवाडकर,अध्यक्ष पी जे दिंडोरकर,संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन  थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ.पोतदार एस एस,  महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.