loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

Mar 16, 2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील वाणिज्य विभाग अंतर्गत वाणिज्य मंडळाद्वारे जागतिक ग्राहक दिनानिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली .
मनमाड शहरातील सुप्रसिद्ध  एडवोकेट रमेश अग्रवाल यांनी व्याख्यानाच्या प्रथम पुष्पात ग्राहक संरक्षण कायदा 2019 यातील क्लिष्ट तरतुदी विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या भाषेत मांडल्या.
द्वितीय पुष्प एडवोकेट शशिकांत व्यवहारे यांनी गुंफले. ग्राहक मंचाचे कार्य याविषयी  तसेच ग्राहक जर जागृत असेल म्हणजेच ग्राहकाने त्याची उदासीनता कमी केली तर वस्तू व सेवा विषयीच्या तक्रारी कमी उद्भवतील , असे प्रतिपादित केले .
अध्यक्ष भाषणातून ज्येष्ठ प्राध्यापक जे.वाय. इंगळे यांनी ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयीची अधिक जाणीव जनजागृती करून देण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादित केले.  व्याख्यानाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. थोरे यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. आरती छाजेड  यांनी केले . प्रा. समाधान सूर्यवंशी यांनी अतिथी परिचय करून दिला आणि आभार प्रदर्शन डॉ. व्ही .एस. नजरधने यांनी केले .
व्याख्यान यशस्वी होण्यासाठी डॉ.आर. डी. भोसले व प्रा. सुनील मुसळे यांनी विशेष श्रम घेतले .बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.