loader image

कुंदलगावचा तलाठी लाच घेतांना ए सी बी च्या जाळ्यात

Mar 19, 2024


चांदवड: चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथे तलाठी  लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,  तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता. चांदवड येथील शेती वाटपा साठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता चांदवड येथील गट नंबर 410,412,414 या गटातील 50-50 गुंठे जमीनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्या ला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता.तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील आलोसे यांच्या कडे देण्यात आला होता.या कामासाठी यातील आरोपी विजय राजेंद्र जाधव याने तक्रारदाराकडे पंचांसमक्ष १५००० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,००० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .याच पार्शवभूमीवर ज्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.