नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ७६ किलो वजनी गटात ७१ किलो स्नॅच ८७ किलो क्लीन जर्क १५८ किलो वजन उचलून आनंदी विनोद सांगळे हिने यूथ मुलींमध्ये सुवर्णपदक तसेच १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले आहे
आनंदी सध्या छत्रे विद्यालयात ८ वी ला शिकत असून जय भवानी व्यायामशाळा येथे सराव करते
आनंदी ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
मनमाड शहरात प्रथमच मनमाड सेल्स युनियन या संघटनेची स्थापना
मनमाड :- मनमाड शहरात प्रथमच मनमाड सेल्स युनियन या संघटनेची स्थापना करण्यात आली असून नाशिक...










