मनमाड – दिनांक 20/3/2024 बुधवार रोजी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड,
राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा करण्यात आला. इयत्ता नववीच्या वर्गातील दिव्या कापडणे, कार्तिकी गवळी, प्रगती पंडित, निवेदिता देवडे, अपेक्षा उगले, गौरी नरोटे, यश गुजर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव दिनेश धारवडकर सर, प्रसाद पंचवाघ, शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर, उप मुख्याध्यापक संदीप देशपांडे सर पर्यवेक्षक व्यवहारे सर, सौ पोद्दार मॅडम,व्ही एस पवार सर उपस्थित होते, विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता तुन चिमणी दिनाचे महत्व सांगितले, तसेच विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून चिमण्यांसाठी दाणे व पाण्याची व्यवस्था केली, देशपांडे सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व्ही.एस. पवार सर यांनी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन का साजरा केला जातो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेतील सर्व सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
