loader image
[ays_poll id=7]

वाणिज्य विभागाची अभ्यास भेट संपन्न

Mar 23, 2024

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयच्या वाणिज्य विभागाची मनमाड शहरातील औद्योगिक वसाहत येथे अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या एन.आर. ब्रदर्स रोलर फ्लोअर मिल प्रा. लि. कंपनी या कारखान्याला अभ्यास भेट देण्यात आली .
याप्रसंगी कंपनीचे संचालक श्री सागर जैन यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करताना कंपनीची स्थापना , कंपनीत निर्माण होणाऱ्या वस्तू जसे की मैदा रवा , ती बनवण्याची प्रक्रिया , एकूण कंपनीची भांडवल गुंतवणूक कर्मचारी संख्या , विविध प्रक्रिया , विपणन व बाजारपेठ या अनेक मुद्द्यांवर सखोल अशी चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार म्हणून लघु उद्योगाकडे वळावे असेही सांगितले. तसेच या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान यात कौशल्य हस्तगत करावे आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी म्हणून टॅली व तत्सम अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान असलेच पाहिजे असेही सांगितले. या अभ्यास भेटीसाठी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. सुभाषजी निकम , विभाग प्रमुख डॉ. एस. डी. थोरे यांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यास भेटीच्या आयोजन नियोजनासाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापिका डॉ. आरती छाजेड ,  प्रा. सुनील मुसळे , डॉ.व्ही. एस. नजरधने व प्रा. समाधान सूर्यवंशी यांनी विशेष भूमिका बजावली. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या अभ्यास भेटीचा लाभ घेतला.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.