loader image

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

Mar 27, 2024


मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक येथे भीम गर्जना मित्र मंडळाची बैठक संपन्न होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल दाणी, सचिवपदी सम्राट कांबळे तर खजिनदारपदी कुणाल निरभवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यंदाही चित्ररथ मिरवणुकीत प्रथम क्रमांक पटकावणार असल्याचे मत अध्यक्ष राहुल दाणी यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल जवळ येऊ लागल्याने मनमाड शहर सज्ज होऊ लागले आहे. त्यामुळे मनमाड शहरात आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या जमधाडे चौकात उत्साह असून डॉ. आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी भीम गर्जना मित्र मंडळाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या जेष्ठ महिला शशिकला गरुड होत्या. यावेळी मागील वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष राहुल दाणी, उपाध्यक्ष निखिल वंजारे, सचिव सम्राट कांबळे, सहसचिव यश रोकडे, खजिनदार कुणाल निरभवणे, सहखजिनदार चेतन चोपकर, ऑडिटर सुनील त्रिभुवन, यावेळी अमोल खरे, रत्नाकर कांबळे, बाळासाहेब भोसले, दिलीप त्रिभुवन, दिनकर कांबळे, दीपक झालटे, राजेंद्र वारुळे, सचिन साळवे, मनोज गांगुर्डे, अनिल चव्हाण, प्रवीण साळवे, रोहित साळवे, सागर खरे, राहुल साळवे, राहुल केदारे, साहील झा, मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा चित्रा वाघ, जनाबाई कांबळे, रत्नाबाई त्रिभुवन, नीता गांगुर्डे, सपना चव्हाण यासह मोठ्या संख्येने भीम गर्जना मित्र मंडळाचे, मातोश्री रमाबाई महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, जमधाडे चौकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.