मनमाड – सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी चैत्र शुद्ध नवमी श्रीरामनवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव तथा भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक कार्यक्रमाचे नियोजन करणे साठी मनमाड शहरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या आणि धार्मिक उत्सव कार्यात मानाचे स्थान असणाऱ्या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न झाली सर्व प्रथम श्रीराम जन्मोत्सव समिती चे सदस्य व 1990 च्या अयोध्या कारसेवा आंदोलना मधील दिवंगत कारसेवक स्व.पंकज जाधव आणि गत वर्षा मध्ये ज्ञात अज्ञात दिवंगत व्यक्तीना समिती तर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समिती चे संस्थापक सदस्य आणि कोषाध्यक्ष नितीन पांडे यांनी बैठकी चे प्रास्ताविक करीत मागील 2023 या वर्षी च्या श्रीराम नवमी उत्सवाचा जमा खर्च सादर केला उपस्थितांन मधून खालील प्रमाणे समिती सदस्य निवडण्यात आले श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 संदीप नरवडे, दिनेश घुगे, निलेश ताठे,अनुज शिंदे,सतीषसिंह परदेशी,मयूर सानप, दुर्गेश झाल्टे, प्रथमेश अहिरे, साहिल साळुंखे,अजय जाधव, मंदार चौधरी, रोहन अग्रवाल
या बैठकीला नितीन पांडे, नाना शिंदे, संतोष बळीद, सुभाष माळवतकर यांनी मार्गदर्शन केले. तर यंदा अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी वर भव्य श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा झाल्याने मनमाड शहरातून यंदा भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे भव्य व आकर्षित करणारे असावे असे नियोजन करण्यात आले या बैठकीला रमाकांत मंत्री, नीलकंठ त्रिभुवन, दिनेश केकाण, आनंद काकडे, आझाद आव्हाड, समीर गुंजाळ,अनंता भामरे, सनी दुसाने, स्वराज शिंदे, पृथ्वीराज शिंदे, अभिजीत पवार, विक्रम पाटील, राम घुगे, अंकित पाठक, निखिल सोनवणे, स्वरूप डांगरे, ऋषिकेश सोनवणे, सोनू गवळी, गणेश दराडे,सनी माळी आदी सह मनमाड शहर व परिसरातील हिंदुत्ववादी पक्ष, संघटना संस्था मंडळे यांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक व श्रीराम भक्त मोठया संख्येने उपस्थित होते बैठकी चे सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले पसायदान ने बैठकी ची सांगता झाली.

राशी भविष्य : २३ऑगस्ट २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....