सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, सोन्याने प्रथमच 71,000 आणि चांदीने 80,000 चा टप्पा ओलांडला तेव्हा दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या.
देशभरातील लोकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. हे केवळ गुंतवणुकीबद्दल नाही, तर ते सामाजिक आणि सांस्कृतिक संलग्नतेबद्दल देखील आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक घडामोडींमुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा कल वाढला असून शेअर बाजारातील चढउतार आणि जागतिक अनिश्चिततेच्या भीतीमुळे सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जात आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून भविष्यात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याच्या अपेक्षेने गुंतवणुकीचे प्रमाणही वाढले आहे.
गेल्या महिन्यापासून सराफा बाजारात प्रचंड वाढ झाली आहे. सोन्याने प्रथमच 70,000 रुपयांचा टप्पा पार केला, तर चांदीनेही 80,000 रुपयांचा टप्पा पार केला. बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,000 रुपये आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी ग्राहकांना प्रति 10 ग्रॅम 70,600 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरानेही नवा उच्चांक गाठला आहे. चांदी 80,000 ₹ किलो पार गेली आहे.
‘औद्योगिक धातूंच्या मागणीमुळे देशांतर्गत आघाडीवर चांदीनेही सार्वकालिक उच्चांक गाठला आहे.’
बाजारातील सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील संकटाकडेही पाहिले जात आहे. भारतात लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत आणि सोन्यात गुंतवणूक सुरक्षित मानली जात आहे, त्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढत आहे, त्याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे. गेल्या 20 वर्षात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून बाजारात सोन्याची मागणीही वाढली आहे. सद्य स्थितीत अस्थिर जागतिक राजकीय परिस्थिती आणि युद्धजन्य वातावरण लवकर न निवळल्यास सोने – चांदीचे भाव 2024 अखेर पर्यंत 85,000 रू तोळा तर चांदी 90,000 हजार रुपये किलो पर्यंत जाण्याचा अंदाज खरा ठरू शकतो असे कंचन ज्वेलर्स चे संचालक व मनमाड सराफ सुवर्णकार असो. चे सचिव दिपक गोयल यांनी सांगितले आहे.
तसेच अमेरिकेतील निवडणूक निकालांचाही सोन्याच्या हालचालीवर परिणाम होण्याची शक्यता असून सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सोन्याचे भाव असेच चालू राहिले तर 2025 पर्यंत सोन्याच्या किमतीत वाढ होत राहील.
सोन्याच्या दरात वाढ होण्याचे कारण म्हणजे जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची झपाट्याने होणारी खरेदी हे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, काहींचे म्हणणे आहे की 2024 मध्ये संपूर्ण जगात मंदी येऊ शकते. दुसरीकडे, क्रिप्टोच्या वाढीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून आगामी काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे दर वाढत आहेत. हाच पॅटर्न भारतामध्येही पाहायला मिळत आहे. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी केल्यास सोन्याची किंमत वाढेल, असा अंदाज आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे. अस्थिर काळात गुंतवणूकदार भांडवली बाजारापेक्षा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या सगळ्यामुळे 2024 च्या अखेरपर्यंत सोने 75 हजारांची पातळी गाठेल, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र, आता एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 75 हजारांच्या पातळीच्या नजीक पोहोचला आहे.
जगभरातील सोन्याच्या किमती लंडन बुलियन मार्केटद्वारे निर्धारित केल्या जातात.यासोबतच अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी केली आहे, त्यामुळे जागतिक सोन्याच्या बाजारात सोन्याची मागणी कायम आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर 85 हजार रुपयांपर्यंत मजल मारू शकते असा अंदाज आहे.
त्यामुळे सोने खरेदी साठी थांबलेल्या ग्राहकांनी अजून वेळ वाट न पाहता सद्य भावात खरेदी न उरकल्यास येणाऱ्या काळात वाढीव भावात दागिने खरेदी करावी लागू शकते असे कंचन ज्वेलर्स चे संचालक दीपक गोयल यांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
(नांदगाव : सुमितकुमार जगधने ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव...











