loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात भाजपा चा 44 वा वर्धापन दिन (स्थापना दिन ) साजरा   

Apr 6, 2024


  मनमाड – विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भा -ज -पा चा 44 वा वर्धापन दिन ( स्थापना दिन ) कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जिल्हा चिटणीस नारायण पवार,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे,जिल्हा चिटणीस एकनाथ बोडखे, नितीन परदेशी सौ अनिता इंगळे, योगेश चुनियान आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते नीलकंठ त्रिभुवन यांचे हस्ते भारतमाता, भारतीय जनसंघाचे संस्थापक स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी, भाजपा चे संस्थापक भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला भाजपा मनमाड मंडल सरचिटणीस आनंद काकडे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ना भाजपा च्या एकात्ममानवता वाद या मूळ तत्वा ची शपथ दिली तर भारतीय जनसंघ व भाजपा च्या गौरवशाली ऐतिहासिक राजकीय वाटचालीची सविस्तर माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी भाजपा कार्यकर्ते नी राजकीय माध्यमातून सक्रिय जनसेवा करावी असे आवाहन केले जिल्हा चिटणीस नितीन परदेशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम अश्या घोषणा चा जयघोष करण्यात आला याच कार्यक्रम मध्ये टिफिन पार्टी म्हणजे एकत्रित स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमा ला  भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जलील अन्सारी,भाजपा शहर उपाध्यक्ष आशिष चावरिया गजू कासार, कैलास देवरे भाजपा शहर चिटणीस मुकेश वेल्लनू भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस सप्तेश चौधरी,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दिपक पगारे,भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन आहिरराव भाजपा कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाबड, भाजपा महिला अनुसूचित मोर्चा जिल्हा सोनाली वाल्मिकी, भाजपा विध्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष सर्वेश जोशी, भाजपा सोशल मीडिया शहर प्रमुख प्रतीक परदेशी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे आदी भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यां सह मनमाड शहरातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बूथ वारियर  कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे सरचिटणीस आनंद काकडे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.