loader image

नाशिक जिल्हातील बाजार समित्या बंदच राहणार . जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली

Apr 8, 2024




नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नाशिक जिल्हातील बाजार समित्या बंद संर्दभात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा जिल्हा उप निबंधक फय्याज मुलानी कामगार आयुक्त माळी यांच्या उपस्थीतीत व्यापारी प्रतिनिधी ‘ बाजार समितीचे पदाधिकारी ‘ शेतकरी प्रतिनिधी ‘ कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत  मिटींग होऊन कुठल्याही निर्णयाविना सदर मिटींग पार पडली.
गेल्या १५ दिवसापासून जिल्हातील  बाजार समित्या बंद आहे. सन २००८ पासून लेव्हीचा विषय निफाड न्यायलयात प्रंलबीत असतानां माथाडी मंडळाचे कामगार आयुक्त  यांनी जिल्हाभरातील सुमारे ३००० व्यापारी बांधवाना लेव्ही वसूलीच्या नोटीसा पाठवल्याने . व्यापारी वर्गाने शेतकरी वर्गाच्या हिशोब पावतीतून हमाली ‘ तोलाई ‘ वाराई कपात करणार असे ठामपणे सांगितले . तर कामगार आयुक्तांनी व्यापारी बांधवांना शेतकऱ्याच्या हिशोबपट्टीतून हमाली तोलाई वाराई कपात करावीच लागेल असा मुद्दा लावून धरला व्यापारी वर्ग आपल्या भूमीकेवर ठाम होते मीटिंग चालू असताना शेतकरी प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी आपल्या भूमिकेवर ठाम होते व्यापारी  प्रतिनिधीकडून श्री नंदूशेठ डागा यांनी यांनी सांगितले की आम्ही आचारसंहिता चालू असल्यामुळे उद्यापासून चालू करण्यास तयार आहे पण शेतकरी वर्गाला पावती देताना त्याच्या पावतीतून कुठल्याही प्रकारची हमाली तोलाई कापणार नाही परंतु त्या शेतकऱ्याकडून हमाली तोलाही रोख स्वरूपात घेऊन आमच्याकडे दोन महिने जमा ठेवून माथाडी मंडळात रोख स्वरूपात भरना करू यावर  कामगार आयुक्त व जिल्हा निबंधक यांनी असहमती दर्शवली .
व्यापारी प्रतिनिधी प्रविण कदम यांनी सांगितले की सरकार नाफेड ‘ एन . सी. सी. एफ . व एन सी ई एल हया सरकारी कंपन्या मार्फत कांदा खरेदी करूण निर्यात करीत आहे  त्यामुळे आमच्या व्यापारी बांधवाची कुठेही गरज पडत नाही. त्यामुळे आपण त्या यंत्रणेमार्फत बाजार समित्या चालू करूण लिलाव करू शकतात . जिल्हाधिकारी साहेबांनी असे सांगितले की तुम्ही मार्केट चालू करा प्रचलित पद्धतीने व्यापार चालू करा यास व्यापारी वर्गाने असहमती दर्शविली . व जिल्हाधिकारी यांनी मिटींग संपल्याचे जाहीर केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.