तालुक्यातील पोही येथील साहेबराव पवार यांच्या राहत्या झापाला आग लागून संसारयोगी वस्तू त्यात धान्य,सर्व वापरात असलेली भांडी,कपडे,आदी महत्वाच्या गोष्टी जळून खाक झाल्याने त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला.ही गोष्ट पोहीचे सरपंच कांतीलाल चव्हाण,व प्रतिनिधी अण्णा मुंडे यांनी तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांना कळवली.
आमदार श्री.कांदे यांनी लगोलग या कुटूंबाला त्यांच्या निवास्थानी (देवाज ) बंगल्यावर बोलावून घेतले.व या कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना एक क्विंटल धान्य,रोजच्या वापरासाठी लागणारी आवश्यक ती स्टील ची भांडी,कपडे,देवून त्या कुटूंबाला आम्ही तुमच्या सोबत असल्याचा दिलासा दिला.या मदतीबाबत या सदर पवार कुटूंबाने आ.सुहास कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव,युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे,भावराव बागुल,प्रकाश शिंदे, मोहन राठोड,भास्कर राठोड,काळू राठोड,इशांत मोरे आदिंसह ग्रामस्थ,शिवसैनिक उपस्थित होते.