loader image
[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

Apr 13, 2024


मनमाड – महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघाची निवड चाचणी नुकतीच पार पाडण्यात आली. या चाचणीसाठी विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातील अंडर 19 वयोगटातील खेळाडुंनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा , अंशुमान सरोदे , दक्ष पाटिल, चिराग निफाडकर व रोहित पवार यांची संभावित खेळाडुंच्या यादित निवड झाली होती व त्यानंतर या खेळाडुंना नंदुरबार जिल्ह्यात होणार्या निवड चाचणी सामण्यात खेळण्याची संधी मिळाली. या निवड चाचणी सामन्यांमध्ये आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर या खूळाडुंनी नंदुरबार जिल्हा अंडर 19 संघात आपले स्थान मिळवण्यास यश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हे सामने पुणे येथे एप्रिल महिन्यात खेळवले जाणार असुन आपल्या मनमाडचे हे नवोदित खेळाडु महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत.
मनमाडच्या या सर्व खेळाडुंकडुन चांगली कामगीरी होऊन त्यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिल्या जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी हे खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड येथे कसुन सरावही करत आहे. नंदुरबार जिल्हा असोसिएशन चे सचिव श्री. युवराज पाटिल सर यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले.

या निवडीसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले असुन श्री गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.