मनमाड – दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते बनविण्यात आले होते.ह्या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हे खड्डे बुजविण्यास कच चा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे पितळ उघड पडले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनमाड नगर परिषदेच्या अंतर्गत सुमारे दोन वर्षापूर्वी मनमाड शहरातील मुख्य रस्ते सिमेंट क्रॉक्रीटीकरणाचे करण्यात आले होते मात्र सदर सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडत चालल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पितळ उघडे पडले असून सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी चक्क कच टाकून त्यावर पाणी मारले जात आहे त्यामुळे वाहन धारक घसरून पडून जखमी होत असल्याचा प्रकार या रस्त्यांवर होत असून या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सदर रस्ता हा सिमेंट चा असल्याने खड्डे क्रॉक्रीट मटेरियलने स्पॅच टाकणे गरजेचे असतांना मात्र त्यात कच टाकून पाणी मारून लेव्हल केले जात आहे सदर प्रकार हा हास्यास्पद असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याने प्रशासन झोपेचे झोंग घेत असल्याचे दिसत असून मात्र नागरीकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक
नगरपालिकेचे ठेकेदाराने घेतलेले काम त्याने पुर्ण करुन त्याची मेंन्टेनन्सची जबाबदारी असते तशा कंडीशन्स असतात मात्र सदर ठेकेदाराकडून ही जाबबदारी टाळली जात असून पालिका सदर खडड्यांवर कच टाकून धातुरमातूर काम केले जात असून किपतत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी संबंधीत ठेकेदारावर नगरपालिकेने कारवाई करून त्यास ब्लॅक लिस्ट करावे. सदर कॉक्रीट रस्त्यावरील खड्डे क्राक्रीटच्या सहाय्याने स्पॅच मारावे अशी मागणी करीत आहोत अन्यथा शिवसेनेकडून तिव्र आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी नगर पालिका प्रशासनावर असा इशारा शहर प्रमुख माधव शेलार यांनी दिला आहे.

जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...