कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन-शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर हे होते.
संस्थेचे चेअरमन-शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर आणि संस्थेचे विश्वस्त वैभव कुलकर्णी यांनी महात्मा फुलें यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. प्राचार्य मुकेश मिसर यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून जीवनकार्याचा गौरव केला.
या अभिवादन कार्यक्रमात प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे आणि धनंजय निंभोरकर यांच्यासह शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. उपस्थितांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.