loader image
[ays_poll id=7]

खाजगी कांदा विक्री केंद्रांची चौकशी करणेच बेकायदेशीर – अनिल घनवट

Apr 16, 2024


 

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शेतकरी व व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या खाजगी कांदा विक्री केंद्रांची चौकशी करण्याचे नाशिक जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेला आदेशच बेकायदेशीर आहे. चौकशीला न घाबरता खाजगी कांदा खरेदी केंद्र सुरू ठेवावेत असे आवाहन शेतकरी नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सांगण्यावरून, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी बाजार समिती बाहेर खाजगी कांदा खरेदी केंद्र व्यापार करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दि.१२ एप्रिल रोजी दिले आहेत. त्यासाठी पथके तयार करण्यात आले आहेत व त्यांनी चौकशी करून अहवाल सादर करावयाचे आहेत.

सदर चौकशीत, महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन)अधिनियम १९६३ व १९६४ नुसार खरेदी करणाऱ्या संस्था, व्यापारी यांनी आवश्यक ते परवाने घेतले आहेत का? किती व्यापार झाला? खरेदीदार/व्यापारी यांनी बाजार समिती फी, देखरेख खर्च भरला आहे का? या बाबी तपासून अहवाल सादर करायचा आहे. आचार संहितेच्या काळात बेकायदेशीर व्यापार सुरू केला असे त्यांचे म्हणणे आहे. लासलगाव, नांदगाव, मनमाड, सटाणा या बजार समितीच्या अध्यक्ष/ सचिवांनी तक्रार केली आहे तसेच माथाडी युनियन व पणन संचालक यांच्या पत्राचा संदर्भ दिलेला आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ नुसार चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ५ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने अधिनियमात सुधारणा करून फळे, फुले व भाजीपाला नियमन मुक्त केला आहे. बाजार समिती बाहेर खरेदी करण्यासाठी कसल्याही परवान्याची गरज नाही तसेच कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट नमूद केले आहे तरी जिल्हा उपनिबंधकांनी त्याकडे दुर्लक्ष करणे शंकास्पद आहे. बाजार समिती बाहेर, बाजार समिती कुठलीही सेवा पुरवत नाही त्यामुळे देखरेख फी देणे लागत नाही व बाजार समितीचे कोणतेही नियम बंधनकारक नाहीत. खाजगी कांदा खरेदी केंद्र पूर्णपणे कायदेशीर आहेत. जिल्हा उपनिबंधक यांनी लावलेली चौकशीच बेकायदेशीर आहे.
बाजार समितीच्या सभापतींनी दिनांक १० पासून १२ एप्रिल तारखे पर्यंत पाठवलेल्या पत्राची तातडीने दखल घेत १२ एप्रिल रोजी उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नो वर्क, नो वेजेस ची अंमलबजावणी करण्याचे आदेश येऊन दहा वर्ष झाले आहेत तरी त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची इच्छा होत नाही. कोट्यवधी रुपयांना कांदा उत्पादक शेतकरी लुटला जात आहे तरी बाजार समितीच्या सभापतींना व उपनिबंधकांनी कारवाई करण्याचे धाडस झाले नाही, मात्र कांदा उत्पादकांनी कायदेशीर मार्ग निवडला तर अतिजलद गतीने कारवाई केली जात आहे. शेतकऱ्यांनी निवडून दिलेले बाजार समितीचे संचालक मंडळ व सभापती हे शेतकऱ्यांचे शत्रू ठरत आहेत. शेतकऱ्यांचे हीत पाहण्या पेक्षा त्यांना हमाल मापरी व व्यापाऱ्याच्या हीत जोपासण्यात जास्त रस आहे असे दिसते.
कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पडले नव्हते, हमाल मापऱ्यानीं बंद पडले होते. त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी शेतकऱ्यांनी सुरू केलेली पर्यायी विक्री व्यवस्था बंद पडणे हा उरफाटा न्याय आहे.
हमाल मापरी संघटित असल्यामुळे ते नेहमीच शेतकऱ्यांवर दादागिरी करतात. येवल्यात शेतकऱ्यांवर हात उचलला गेला. पुन्हा असा प्रकार झाला तर शेतकऱ्यांनी जशास तसे उत्तर द्यावे. शेतकऱ्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत हे लक्षात असू द्या.
प्रशासनाला काय चौकशी करायची ती करू द्या पण खाजगी कांदा खरेदी विक्री बंद करू नये असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. आता बाजार समित्या सुरू झाल्या आहेत, शेतकऱ्यांना जिथे परवडेल तिथे ते आपला कांदा विकतील. प्रशासनाने बेकायदेशीरपणे, नियमनमुक्त झालेल्या पिकांवर जबरदस्ती नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केल्यास कांदा उत्पादक शेतकरी जिल्हा उपनिबंधकांना बेमुदत घेराव घालण्याचा आंदोलन करतील असे शेतकरी नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली.
१४/०४/२०२४

अनिल घनवट


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
.