नाशिक: जागतिक यकृत दिन २०२४ च्या निमित्ताने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक यकृत दिन साजरा करण्यात आला. देशातील मोठ्या संख्येने लोक नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) ने ग्रस्त आहेत. ज्यामुळे सिरोसिस आणि शेवटी यकृत प्रत्यारोपण किंवा मृत्यू देखील होतो. यकृताच्या समस्यांचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी नियमित तपासणी द्वारे यकृताच्या आजारांचा वेळेवर उपचार घेणं महत्त्वाचे आहे. सध्या यकृताचे आजार सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतात. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी), नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (एनएएसएच), एंड-स्टेज क्रॉनिक लिव्हर डिसीज, सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, तीव्र आणि क्रॉनिक हिपॅटायटीस, यकृताचा कर्करोग, पित्त नलिकाचा कर्करोग मोठ्या संख्येने लोक आढळून येत आहेत. . पण, NAFLD ही आजकाल लोकांमध्ये दिसणारी एक सामान्य समस्या आहे. विविध तपासणी साधनांच्या सहाय्याने रुग्णांवर योग्य उपचार करणे ही काळाची गरज आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिकने आता एक पाऊल पुढे येऊन लवकर निदान व उपचार होतील या अनुषंगाने या अद्ययावत असे गॅस्ट्रोएंटरोलॉजी डिपार्टमेंट सुरु केले आहे.
या प्रसंगी पोट व यकृत तज्ञ् डॉ. तुषार संकलेचा म्हणाले, “नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हा मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्यांमध्ये वारंवार यकृताचा आजार होत आहे. अलीकडील अभ्यासामध्ये असे निर्दर्शनास आले आहे कि , भारतातील ३५% लोकसंख्या NAFLD ने त्रस्त आहे. NAFLD च्या गुंतागुंत म्हणजे फायब्रोसिस, सिरोसिस आणि हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा. NAFLD मुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, एक्स्ट्राहेपॅटिक निओप्लाझिया आणि इतर अवयवांचे नुकसान देखील होते, जसे की मूत्रपिंड. एनएएफएलडीला मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक घटक मानला जातो, ज्यामध्ये लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध किंवा टाइप 2 मधुमेह मेलिटस (T2DM), उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया यांचा समावेश होतो. रोगाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या NAFLD रुग्णांना नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस (NASH) आणि सिरोसिसचा त्रास होतो. पुढील दशकात, फायब्रोसिस असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तर आहेच परंतु फायब्रोसिस असलेल्या NASH रुग्णांची संख्या २०३० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे.”
पुढे ते म्हणाले, एचबीए, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब , डिस्लिपिडेमिया आणि’ मधुमेह अशा लोकांना यकृताच्या समस्यांचा धोका जास्त असतो. वेळीच उपाययोजना केल्यास यकृताच्या आजारांवर प्रतिबंध घालणे सोपे जाते.
या प्रसंगी हॉस्पिटल्स मधील डॉक्टर , परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.