loader image

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

Apr 20, 2024




मनमाड – गुरुवार 18 एप्रिल 24,  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळत आहे.
2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाडमधील रुषी शर्मा  व अंशुमान सरोदे यांनी सामण्यामध्ये उत्तम असे प्रदर्शन केले. साऊथ झोन विरुध्द खेळताना या सामण्यात रूषी ने दोन्हि इनिंग मध्ये मिळवुन 6 बळी प्राप्त केल्या तसेच अंशुमान  सरोदे याने पहिल्या इनिंगमध्ये 38 चेंडुमध्ये 43 धावा जमवल्या ज्यामध्ये 7 चौकार व 1 षटकार त्याने लगावला. हे खेळाडु मनमाडचे असुन भुमी क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करतात.

मनमाडमधील या खेळाडुंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर  नंदुरबार संघाला विजय प्राप्त करण्यात यश आले. या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळडुंची प्रशंसा केली जात आहे. या स्पर्धेत त्यांनी चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 19 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव यु. पाटील सर यांनी या खेळाडुंना या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.

भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यब शेख,  हबीब शेख  , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख ,  सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार,  दक्ष पाटिल,  चिराग निफाडकर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक  सुखदेव सिंग  सर यांचे विशेष सहकार्य लाभले.  त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.