loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – दिंडोरी मतदार संघात महाविकास आघाडीला झटका – जीवा पांडू गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Apr 27, 2024


नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा झटका महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिद्दीने भरला माजी आमदार जीवा पांडू गावित यांचा अर्ज महाविकास आघाडी मध्ये एक घटक पक्ष असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी पूर्ण राज्यांमध्ये आपल्याला किमान एक जागा मिळावी यासाठी आग्रह धरला होता 48 पैकी 47 जागांवर  आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहोत राज्यातील जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपला पक्ष उभा आहे 29 जिल्ह्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाची ताकद मोठी आहे कम्युनिस्ट पार्टीला एक जागा मिळावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आग्रह धरला मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एक जागा सोडण्यासही महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता न दाखवता दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात मतदारसंघाला अपरिचित असलेला आणि निवडणुकीच्या दृष्टीने सर्व दृष्ट्या कमकुवत असलेला उमेदवार दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जोरदार लढत देऊ शकणारा उमेदवार कम्युनिस्ट पार्टीकडे आहे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत जिवा पांडू गावित यांनी यापूर्वी अनेक लॉंग मार्च आणि आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आहे आदिवासींमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आहे कॉम्रेड जिवा पांडू गावित  यापूर्वी सात वेळा पेठ सुरगाणा भागातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना संसदीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे असे सर्व बाबी असताना देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी मध्ये कम्युनिस्ट पक्षाला राज्यातली केवळ एक जागा द्यायला देखील अनुकूलता न दाखवल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला काही दिवसापूर्वी त्यांनी नाशिक जिल्ह्यात दिंडोरी येथे जाहीर सभा घेऊन महाविकास आघाडीला इशारा दिला त्यानंतर महाविकास आघाडी तर्फे शरद पवार गटाच जयंत पाटील यांनी धावत पळत ओझर विमानतळावर कॉम्रेड जीवा पांडू गावित सी टू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्याशी चर्चा केली परंतु जीवा पांडू गावित यांची उमेदवारी मागे घेण्यास त्यांचे मन वळविण्यात जयंत पाटील अयशस्वी झाले त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काय भूमिका घेतो याकडे अनेकांचे लक्ष लागले होते दरम्यान मार्क वादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आपल्या कट्टर कार्यकर्त्याला निवडणूक रिंगणात उतरण्यास अनुमती दिल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी आपला  अर्ज दाखल केला मात्र अर्ज दाखल केला असला तरी महाविकास आघाडी आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल आणि राज्यात मागितलेली केवळ एकमेव जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडेल असा आपल्याला अद्यापही विश्वास आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप सहा तारखेपर्यंत वेळ असल्यामुळे महाविकास आघाडीचा पाठिंबा आपल्या उमेदवाराला मिळेल असा विश्वास पक्षाच ज्येष्ठ नेते कॉम्रेड अशोक ढवळे यांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या उमेदवारी बाबत बहुतांश शेतकरी मतदारासलेल्या या मतदारसंघात अनेक  पेच निर्माण झालेले असताना महाविकास आघाडीचे उमेदवार भगवान भगरे यांनी प्रचार जोरात सुरू केला होता मात्र भगवान भगरे आर्थिक दृष्ट्या कमकुवत उमेदवार असल्याने त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सहाय्यता निधी जमा करण्यास सुरुवात केल्यामुळे तोही चर्चेचा विषय झाला होता भगवान भगरे यांच्याकडे संसदीय कामकाजाच अनुभव देखील नगण्य असल्यामुळे आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना कांदा आणि अन्य प्रश्नावरून मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने महाविकास आघाडीला मोठा आत्मविश्वास निर्माण झाला होता परंतु आता महाविकास आघाडीतच फूट पडल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक होणार आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आहेत मात्र 19 च्या निवडणुकीत डॉक्टर भारती पवार यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मोदी लाटेत मोठा विजय संपादन केला तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि जनजाती कल्याण राज्यमंत्री म्हणून दोन मंत्रिमंडळ ही मिळवली त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने दिंडोरीची लढत प्रतिष्ठेची बनली आहे


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
.