loader image

करंजवण पाणी योजनेतील पाणी आरक्षित करण्यासंदर्भात शिवसेनेचे निवेदन

Apr 27, 2024


मनमाड करांची जिवनदायी करंजवण पाणी योजना पुर्ण झाल्यानंतरच आवश्यक आरक्षित पाण्यातवाढ केल्यानंतरच इतरत्र पाणी देण्याबाबत
विचार करावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने
मुख्याधिकारी मनमाड  नगरपरिषद यांना
शिवसेना तर्फे  देण्यात आले. शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजना पूर्ण झाल्यानंतर मनमाडकरांसाठी आवश्यक आरक्षित पाण्यातवाढ केल्यानंतरच इतरत्र पाणी देण्याबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मनमाड शहर हे सुमारे दिड लाख लोकवस्तीचे शहर असून कित्येक वर्षापासून मनमाड शहरातील माता-भगिनींना सर्वत्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे तसेच मनमाड शहर हे भीषण पाणीटंचाईसाठी वर्तमानपत्रे, न्युजचॅनल व सोशल मिडीयाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात ओळखला जातो. तसेच पाणी टंचाई कायमची दूर होण्यासाठी मनमाड शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, अनेक गहरी संघटनांनी तसेच पत्रकार, डॉक्टर, वकील, लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी पाणीटंचाई मनमाड विरोधात शासन दरबारी निवेदने, तक्रारी, उग्र आंदोलने, सामुहिक मोर्चा, रास्तारोको केले तसेच मा. हायकोर्टात देखील संपूर्ण मनमाडकरांच्या वतीने याचिका दाखल केली. त्याचप्रमाणे तत्कालीन नगराध्यक्ष, सर्वपक्षीय नगरसेवक व मुख्याधिकारी तसेच मनमाड शहरातील सर्व महिला, नागरिक, तरुण-तरुणीं यांनी मनमाड शहरासाठी जीवनदायीनी ठरणारी तसेच महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या प्रयत्नांतून करंजवण योजनेला अंतिम प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे तसेच तिचे काम देखील सुरु असून सदर काम पूर्ण होण्यास वेळ नाही लागणार आहे.

मनमाड शहरातील वाढती लोकसंख्या पाहता महाराष्ट्र शासनाने ठरविलेल्या पाण्याच्या आरक्षणांमध्ये वाढ करण्यात यावी जेणेकरुन शहरातील संपूर्ण जनतेला पुरेसे पाणी उपलब्ध होईल. सदर करंजवण योजना १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर किमान वर्षभर मनमाडकरांना सदर योजनेचा किती फायदा होतो याचा अभ्यास करण्यात यावा व त्यानंतरच मनमाड नगरपरिषदेमध्ये लोकनियुक्त बॉडी आल्यानंतर सदर योजनेतील आरक्षित पाणी मनमाड शहरात व्यतिरीक्त इतर कोणाला द्यावे की नाही याचा अंतिम निर्णय लोकनियुक्त बोंडी सर्वानुमते ठरवेल.

तसेच करंजव्हण योजनेतील आरक्षित पाणी मनमाडकरांना मिळण्याआधी सदर पाणी इतरत्र कोणाला देण्याचा करारनामा अथवा अॅग्रीमेंट करु नये तसेच सदर चुकीच्या करारनाम्यास कोणतीही प्रशासकीय मंजुरी देण्यात येवू नये असे केल्यास हा मनमाडकर जनतेची फसवणूक व विश्वासघात समजण्यात येईल व पुन्हा एकदा मनमाड शहरातील सर्व नागरिक, माता-भर्गिनींना सोबत घेवून पाण्यासाठी रस्त्यावर उतरुन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अतितीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी मनमाड नगरपालिका व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी असे निवेदन मनमाड नगरपरिषद मुख्य अधिकारी शेषराव चौधरी साहेब यांना देण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.