मनमाड (प्रतिनिधी) : नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांचे चुलते जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम (आप्पा) त्र्यंबक खरे यांचे आज शुक्रवारी दिनांक २६ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
शांताराम खरे हे आप्पा, बापू या नावाने त्यांना ओळखले जाई. येवला तालुक्यात विखरणी गावात पुरोगामी विचार चळवळ रुजविण्याचे काम शांताराम खरे यांनी केले. दलित पँथर चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. विखरणी गावात जुन्या जाणत्या सामाजिक कार्यकर्त्या मध्ये शांताराम बापू हे अग्रभागी होते. गावातील समाजकारण, राजकारण, धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. नंतरच्या काळात रिपाईचे काम त्यांनी केले. अगदी मनमिळावू स्वभाव असलेले शांतारामआप्पा सर्वांनी स्नेहपूर्न संबंध होते. अल्पशा आजाराने त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्थारतील मान्यवर, विखरणी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनुसया खरे, मुलगा अनिल खरे, सून अनिता खरे (ग्रामपंचायत सदस्य), मुलगी प्रभावती पगारे यांच्यासह मोठा गोतावला आहे.