मनमाड – चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील भागवत झाल्टे
यांनी वारंवार वन विभागाकडे जंगली पशु प्राण्यांसाठी पानवट्या मध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरच्या पाण्याची मागणी केली होती त्याची वन विभागाने तात्काळ दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी दोन टँकर पाणी टाकले त्यामुळे वन्य प्राण्यांना जीवदान मिळाले.येवला तालुक्यातील सावरगाव येथे हि हरिणांसाठी व जंगली प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करुवी येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे वन्य प्राण्यांच्या संख्येवरून आवश्यक त्या ठिकाणी पानवठे उपलब्ध करून द्यावा
तसेच जागोजागी कुंड्यांची निर्मिती करून द्यावी जवळ असलेले चांदवड तालुक्यातील समिट स्टेशन जवळील जंगलात शंभर पेक्षा हरणांची संख्या वाढली आहे तिथेही पाण्याची सुविधा त्वरित करावी व तेथील पाण्याचा साठा सध्या खराब होऊन गेल्यामुळे तेथील हरणांना पाण्याची सुविधा लवकरात लवकर करण्यात यावी त्यामुळे कातरणी तळेगाव समिट वडगाव परिसरात हरणे मोठ्या प्रमाणात मानवी वाड्या- वस्तीकडे पसरत आहे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो झालास तर याला कोण जबाबदार राहतील या मागणीची त्वरित दखल घेऊन आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी पाणवठे उपलब्ध करून देण्यात यावे व वेळोवेळी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....