मनमाड – बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदार मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव हे शेतकऱ्यांनी त्यांना विक्री केलेल्या मेथी भाजी या शेतमालाचे पेमेंट थकवित असल्याची बाबत बाजार समितीचे निदर्शनास आली, परंतु याबाबत शेतकरी बाजार समितीकडेस लेखी तक्रार करीत नव्हते, म्हणुन बाजार समितीने दि. 03/03/2024 रोजी वृत्तपत्रात जाहिरात देऊन ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट थकीत आहे, त्यांनी तात्काळ बाजार समितीकडे याबाबतची तक्रार करावी असे जाहीर आवाहन शेतकरी बांधवांना केले. त्यानंतर बाजार समितीकडे वेळोवेळी 95 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानंतर याबाबत बाजार समितीचे सभापती दिपक चंद्रकांत गोगड व सत्ताधारी संचालक मंडळाने या प्रकरणी दोषी असलेल्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई केली व बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे अशा 95 शेतकऱ्यांना त्यांचे शेतमालाची रक्कम वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाजार समितीकडे दाखल केलेल्या तक्रारदार सर्व 95 शेतकऱ्यांची शेतमालाची थकलेली संपुर्ण रक्कम बाजार समितीद्वारे आज रविवार दि. 28/04/2024 रोजी दुपारी 03.00 वाजता ज्या-त्या शेतकरी बांधवांना वाटप केली जाणार आहे. यामुळे निश्चितच मनमाड बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल अशी आशा बाजार समितीचे सभापती श्री. दिपक चंद्रकांत गोगड यांनी यावेळी व्यक्त केली.

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....