मनमाड – येथील मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव यांनी शेतकरी बांधवांचे थकविलेल्या रक्कमेसंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दाखल केलेल्या तक्रारदार 95 शेतकऱ्यांची शेतमालाची थकलेली रक्कम बाजार समितीद्वारे आज रविवार दि. 28/04/2024 रोजी दुपारी 03.00 वाजता त्या-त्या शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांना ऐन दुष्काळाच्या अडचणीत त्यांची थकलेली रक्कम मिळाली म्हणुन त्यांनी समाधान व्यक्त केले आणि बाजार समितीचे सभापती व सत्ताधारी संचालक मंडळाचे कौतुक केले. यावेळी बाजार समितीचे सभापती दिपक चंद्रकांत गोगड, उपसभापती आनंदा विठ्ठल मार्कंड, संचालक गंगाधर हरी बिडगर, गणेश जगन्नाथ धात्रक, कैलास नामदेव भाबड, पुंजाराम पोपट आहेर, योगेश दुर्योधन कदम, सुभाष जयराम उगले, किसनलाल कन्हैयालाल बंब, रुपेशकुमार रिखबचंद ललवाणी तसेच अशोक रुंझा पाटील व रमेश कोंडाजी कराड आणि समस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेकडे : ना.डॉ भारती पवार
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध ठिकाणच्या विकसित भारत संकल्प यात्रांमध्ये...