मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेचे ज्येष्ठ ग्रंथपाल मन्सूरी अब्दुल हमीद सक्रोद्दीन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांच्या हस्ते मनमाड एज्युकेशन सोसायटी संचलित,एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड चे संस्थापक पैगंबरवासी हाजी अहमद हाजी अब्दुल करीम गाजियानी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...