loader image

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

May 4, 2024


मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रिडा संकुल येथे उद्या शनिवार दिनांक 4 मे पासुन सुरवात होणार असुन या सोहळ्याचा शुभारंभ करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान झाले आले.

मनमाड येथे शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्ताने दिनांक 4 मे पासुन ते 12 मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याची सुरवात दिनांक 2 मे रोजी साधू संतांच्या आणि शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून करण्यात आले. या सोहळ्याच्या शुभारंभ करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण येथुन नाथज्योती एकनाथ महाराजांचे वंशज हभप श्री सरदार महाराज यांच्या हस्ते घेऊन मनमाड येथून गेलेले 50 भक्त हे अखंड नाथज्योत ही पायी मनमाड येथे घेऊन येणार आहे.दिनांक 4 मे रोजी मनमाड शहरात नाथज्योतीचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात येणार असुन जयश्री टॉकीज ते महर्षी वाल्मिकी क्रिडा संकुल पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या सोहळ्यामध्ये हभप संजय धोंडगे , हभप समाधान महाराज पगार, हभप बंडातात्या महाराज कराडकर, हभप कान्होबाराय महाराज मोरे, हभप बाळकृष्ण महाराज बुरकुल, हभप लक्ष्मण शास्त्री महाराज कोकाटे, हभप निवृत्ती महाराज रायते, हभप पोपट महाराज पाटील, हभप अनिल महाराज पाटील, हभप जगन्नाथ महाराज पाटील, हभप विश्वनाथ महाराज वारींगे, हभप योगीराज महाराज गोसावी, हभप तुकाराम महाराज जेऊरकर, हभप ज्ञानेश्वर महाराज कदम, हभप उमेश महाराज दशराथे, हभप महादेव महाराज राऊळ, हभप एकनाथ महाराज सदगीर या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध असणाऱ्या कीर्तनकार मंडळींच्या किर्तनांची आणि प्रवचनाची पर्वणी रोज सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजता भाविकांना प्राप्त होणार आहे.

मनमाड शहरात होणाऱ्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशा अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्री संत एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.