नाशिक मर्चेंट बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशशेठ दायमा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून भाजपात जाहीर प्रवेश करत घरवापसी केली.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन विक ास मंत्री गिरीष महाजन यांच्ये उपस्थितीत धुळे येथे भाजपात त्यांनी प्रवेश केला.यावेळी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी,
सटाणाचे आमदार दिलीप बोरसे, भाजपाचे धुळे येथील अध्यक्ष अनुपम आग्रवाल,लामको बँकेचे संचालक कैलासशेठ सोनवणे, भाजपाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष समीर समदिडिया हे दायमा यांच्या प्रवेश सोहळ्यावेळी उपस्थित होते.