loader image

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

May 6, 2024


मनमाड – उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह उशिरा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, माजी नगरसेवक भगवान ओशेटे, भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, इगतपुरी पंचायत समिती सभापती रंगनाथ कचरे, इगतपुरी युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार तसेच भगूर, इगतपुरी, शिरसाळे विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. गेली १२ वर्षे शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख असा प्रवास केला होता, मात्र लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत माझ्याशी असा दगाफटका केला जाईल याची मला कल्पना नव्हती. उबाठा गट मुख्यमंत्री साहेबांना गद्दार म्हणत असला तरीही प्रत्यक्षात या गटातीलच दोन तीन गद्दार लोकांनी पक्षाचे वाटोळे केले असून तेच खरे गद्दार आहेत. उबाठा गटात आपल्याला न्याय मिळू शकला नाही त्यामुळे आता वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे करंजकर यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणे उबाठा यांनी केव्हाच सोडून दिले असून कार्यकर्त्यांला येणाऱ्या अडचणींशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. फक्त मी आणि माझे कुटूंबीय एवढाच संकुचित विचार ते करतात. त्यांच्या याच विचारामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून अनेक लोकं पक्ष सोडून गेले. ५० आमदार, १३ खासदार आणि असंख्य पदाधिकारी पक्ष सोडून जात असले तरीही एका माणसाला त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यामुळे करंजकर यांचे पक्षात स्वागत करत असून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ते जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यासमयी व्यक्त केली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आणि सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे तसेच नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.