मनमाड:- मनमाड मधील नामांकित गूड शेफर्ड स्कूलचा सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षाचा दहावी बोर्डचा निकाल १०० % लागला आहे. बोर्डाची परीक्षा मार्च – एप्रील २०२४ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत कु. सलोनी प्रितम आहेर (प्रथम क्रमांक ९६%), कु. आर्या संजय पाटील (द्वितीय क्रमांक ९३ %), कु. सई प्रितम आहेर (तृतीय क्रमांक ९३%), कु.गौरव ठोके (९२%), कु. मुब्बशिर शेख (९१%) या विद्यार्थ्यांनी आपली धवल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखून शाळेचा नावलौकिक केला आहे. C.M.E.F. ट्रस्टचे चेअरमन व सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.