Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

May 9, 2024

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघाची निवड चाचणी नुकतीच पार पाडण्यात आली.
ज्यामध्ये मनमाड मधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु साक्षी शुक्ला , आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी यांची नंदुरबार जिल्हा संघाच्या खेळाडुंच्या यादित निवड झाली.

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हे सामने छत्रपती संभाजीनगर येथे मे महिन्यात खेळवले जाणार असुन आपल्या मनमाडच्या ह्या नवोदित खेळाडु महाराष्ट्र संघात निवड होण्यासाठी आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत.
मनमाडच्या या सर्व महिला खेळाडुंकडुन चांगली कामगीरि होऊन त्यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा सर्वाकडुन या खेळाडुंना दिल्या जात आहे. मनमाड शहराचे नंदुरबार जिल्ह्यासंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी हे खेळाडु भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड येथे कसुन सरावही करत आहे. नंदुरबार जिल्हा असोसिएशन चे सचिव युवराज पाटिल सर यांचे विशेष सहकार्य या खेळाडुंना लाभले.

या निवडीसाठी नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदे व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , तय्यबभाई शेख, अंकित पगारे , हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, साहील मोरे , चिराग निफाडकर, रोहीत पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुचे प्रशिक्षक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले असुन श्री गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले व पुढिल निवड सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]