loader image

मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची हीच वेळ – शरद पवार

May 17, 2024


मनमाडला सभेत शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका
मनमाड :- केंद्रात गत दहा वर्षांपासून सत्तेत असलेले भाजपचे सरकार हे फसवेगिरीचे सरकार असुन त्यांच्यावर विश्वास ठेवू नका देशाची सत्ता मोदीच्या हातात आहे ते बोलतात एक आणि करतात एक आज नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद सर्वच निवडणुका थांबील्या याच्यामुळे लोकशाही जिवंत राहणार नाही भविष्यात ते सर्वच निवडणूक बंद करतील यामुळे या मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनमाड येथे जाहीर सभेत व्यक्त केले महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली येत्या 4 तारखेला जे होईल ते देशाला आणि जगाला समजेल असेही पवार म्हणाले.

लाल बावटा दीड लाख मतांची मदत करणार – डॉ डी एल कराड
महाविकास आघाडीत आम्ही कम्युनिस्ट पक्ष देखील महत्वाचा घटक आहोत सुरवातीला आमच्याबद्दल बऱ्याच चुकीच्या अफवा पसरवल्या होत्या मात्र त्यात तथ्य नाही आम्ही मोदीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काहीही करू शकतो भास्कर भगरे यांना खासदार करण्यासाठी लाल बावटा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातुन किमान दीड लाख मत भगरे सरांच्या पारड्यात टाकणार आहे अशी घोषणा कम्युनिस्ट नेते डॉ डी एल कराड यांनी यावेळी केली
यावेळी ते बोलताना म्हणाले की देशाचा पंतप्रधान नाशिक जिल्ह्यात आले आणि येथील प्रश्नांवर न बोलता ते
तुमच्या गळ्यात मंगळसूत्र राहणार नाही काँग्रेस तुमच्या घरातील सोन घेऊन इतरांना वाटेल असे बोलले असे बोलून त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत केला आहे ही शुद्ध फसवणूक आहे असं कधीच होणार नाही ते विचारतात शरद पवार यांनी 10 वर्षात काय केलं मी अन्न धान्य पूर्ण देश केलं परदेशातून धान्य का आणावे राज्यात या एका महिन्यात 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मी कृषी मंत्री असताना याच मनमाड मध्ये माझी सभा होती येथे कळलं कि निर्यात बंदी केली थेट दिल्लीला गेलो आणि कांदा निर्यात उठवली होती असे निर्णय घ्यावे लागतात मात्र हे सरकार कांदा, कापूस, सोयाबीन वर बंदी लावत आहे.मोदी अभिमानाने सांगतात आम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो धान्य पीकवितो कोण? पिकवणाऱ्याचा विचार करणार कि नाही.
हे सरकार फसवेगिरीचे सरकार आहे त्यांचेवर विश्वास ठेऊ नका जण जंगल आणि जीवन वाचवण्यासाठी आदिवासी झटत असतो या जगाचा खरा मालक आदिवासी आहे त्याला जगवा यासाठी भगरे सरासारख्या शिक्षकाला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावर जयंत पाटील,माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सक्षणा सलगर,माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्राध्यापक नितेश कराळे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, हेमंत टकले, कॉ डी एल कराड, कोंडाजी मामा आव्हाड, श्रीराम शेटे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,अनिल आहेर,शिरीष कोतवाल, आमदार नरेंद्र दराडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात कांदा हा एकमेव प्रश्न नाही 10 वर्षात केंद्राने आपल्याला लुबाडलं आहे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देतात आणि लाखो रुपये त्यांच्या खिशातून काढून घेतात त्यांचा 400 पार चा नारा थांबला 200 पार होणार कि नाही याची चिंता भाजपला पडली देश मूठभर लोक चालवीत आहे मूठभर लोक श्रीमंत झाली आहे देशात गरीब आणि श्रीमंत दरी वाढविण्याचे काम मोदी सरकार नें केले आहे
इलेक्ट्रोलचा घोटाळा इतकं मोठा आहे कि जगाने त्याची दखल घेतली आहे देशात एकच पक्ष श्रीमंत झाला आहे शिवसेना फुटली आमचा पक्ष देखील फोडला.. तुम्ही चांगले काम केल मग तुम्हाला इतर पक्ष फोडण्याची गरज काय होती दोन पक्ष फोडण्याचे काम भाजप नें केले आहे नाशिक जिल्हा कायम पवार साहेबाच्या पाठीशी राहिला आहे याहीवेळी नाशिक मधील दोन्ही खासदार विजयी करून हा विश्वास कायम ठेवा असे आवाहन केले तर सक्षणा सलगर यांनी अग्निपथ कविता म्हणून शरद पवार लढवये नेते आहेत त्यांच्यासोबत आपणही लढू व जिंकू असे आवाहन केले तर प्राध्यापक नितेश कराळे यांनी आपल्या खास शैलीत मोदीला आडवे हात घेतले आमच्या बायकोचे मंगळसूत्र आम्ही बघून घेऊ चोट्या तु तुझ्या बायकोचे बघ ना आशा खास शैलीत त्यांनी मोदींवर सडकून टीका केली तर अनेक मान्यवरांनी नांदगाव तालुका दुष्काळ ग्रस्त आहे त्याला कायमस्वरूपी मुक्त करावे अशी मागणी केली.यावेळी शरद पवार यांच्या गाण्यावर अबाल वृद्धांनी देखील नृत्य करून ही विजयाची सभा असल्याचे जाहीर केले.
केंद्रात आरोग्यमंत्री असूनही महाराष्ट्राला मदत केली नाही ; राजेश टोपे
कोरोना सारखी महाभयंकर महामारी आली त्यावेळी संबंध देशात मोठया प्रमाणात वाईट परिस्थिती होती एकीकडे ऑक्सिजन मिळत नव्हता तर अनेक ठिकाणी कोरोनाचा उपचार करण्यासाठी रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नव्हते आशा परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री नात्याने मी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो योगायोगाने तेव्हा केंद्रात महाराष्ट्र राज्याचे विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार बाई डॉ भारती पवार या केंद्रीय आरोग्यराजमंत्री होत्या मात्र त्यांनी महाराष्ट्राला मदत केली नाही ही वस्तुस्थिती आहे यामुळे आशा उमेदवाराला पुन्हा निवडून देण्याची चूक करू नका असे स्पष्ट मत माजी आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.