Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ब्राम्हण समाजाला संरक्षण मिळावे – श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड ची मागणी

May 20, 2024

मनमाड – बीड येथील पिंपरगव्हाण रोड येथील रहिवासी असणारे राऊतमारे कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तर्फे जाहीर निषेध करण्यात आला तसेच सकल ब्राह्मण समाजास संरक्षण मिळावे अशी मागणी मा.पोलीस उपअधीक्षक मनमाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली
दिनांक १३/५/२०२४ सोमवार रोजी बीड येथील पिंपरगव्हाण रोड, दत्तधाम पाटी, शिवाजीनगर, बीड, महाराष्ट्र येथील श्री अशोक राऊतमारे हे आपल्या कुर्ला या गावी दुपारी कुटुंबीयांसह मतदान करून दुपारी बीड येथे आले असता यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली व खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या, त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांना अनिल पाटील, दादा सोनवणे, दादा यादव व अज्ञात दोघे यांनी शिवीगाळ करून तुम्ही कमळाला मतदान का केले ? तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना जीवे मारतो, तुम्ही गावाकडे कसे येतात तेच पाहतो असे म्हणून श्री अशोक राऊतमारे यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली तसेच मारण्यासाठी तलवार सुद्धा उपसण्यात आली.

लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत निंदनीय सदरील कृत्याचे श्री परशुराम प्रतिष्ठान, मनमाड, हिंदी भाषिक ब्राह्मण संघ, मनमाड जाहीर निषेध करतो व त्वरित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सदरील घटनेनंतर ब्राह्मण समाजास संरक्षण मिळावे कारण सदर घटनेचा ब्राह्मण समाजावर विपरीत परिणाम होऊन मतदानावर फरक पडू शकतो, त्यामुळे ब्राह्मण समाजाला शासनाच्या वतीने संरक्षण देण्यात यावे.

अशा आशयाचे निवेदन दिनांक 19/5/2025 रविवार रोजी श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तसेच हिंदी भाषिक ब्राह्मण संघ मनमाड यांच्या वतीने बीड येथील  अशोक राऊतमारे कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व सकल ब्राह्मण समाजास संरक्षण मिळावे यासाठी पोलीस स्टेशन मनमाड येथे निवेदन देण्यात आले यावेळी  समाज बांधव  समीर कुलकर्णी,  युवराज बळेल,  सर्वेश जोशी,  संजय पांडे,  देवा गंगेले, सौ नम्रता बळेल जोशी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]