मनमाड – चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...