नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात
काही मुख्य कारणे आणि परिणाम असे
वेगावर नियंत्रण नसणे, जास्त वेगामुळे वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते, ज्यामुळे अनपेक्षित परिस्थितीत गाडी थांबवणे किंवा वळवणे अवघड होते.
रस्ता स्थितीचा अंदाज न येणे भरधाव वेगाने चालवताना खड्डे, वळण, पाणी, किंवा इतर अडथळे वेळेवर लक्षात येत नाहीत.
इतर वाहनांसोबतच्या अंतराचे योग्य मोजमाप न होणे जास्त वेगामुळे इतर वाहनांसोबत सुरक्षित अंतर राखणे कठीण होते.
वेळ कमी होणे अनपेक्षित घटना घडल्यास, तारांबळ होणे असाच काहीसा प्रकार नांदगाव नजीक ४० गांव रोडवर झाला दरम्यान
पानेवाडी गॅस प्रकल्पातून गॅस सिलेंडर घेऊन ४० गाव दिशेने भरधाव जाणाऱ्या मालवाहू कंटेनर वरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर अपघात ग्रस्त झाला सुदैवाने प्राण हाणी झाली नाही चालक बालबाल बचावला ही घटना नांदगाव नजीक ४० गांव रोडवर गिरणा काॅलणीजवळ घडली .
पानेवाडी एच पी गॅस प्रकल्पातून
१६० सिलेंडर भरलेला कंटेनर चालक
वना उत्तम मोरे रा.४० गांव ग्रामीण हे मनमाडहुन ४० गांव कडे घेऊन जात असताना मध्यराञी १ च्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा अचानक सुटल्यानॆ कंटेनर गिरणा काॅलणी जवळ रोडच्या बाजूला फुटपाथवर घसरत जाऊन पलटी झाला यावेळी गाडीतील डिझेल टँकलिकीज होऊन गळती झाली.या दरम्यान चालक कसाबसा वाचला त्याच्या डोक्याला व अंगाला मार लागुन दुखापत झाली. दि २३ रोजी सकाळी गॅस सिलेंडर दुसर्या गाडीत पलटी करण्याचे कांम हाती घेतले होते.या घटनेमुळे कंटेनरचे व फुटपाथचे मोठे नुकसान झाले .

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...