loader image
[ays_poll id=7]

५००० ची लाच स्वीकारताना लासलगाव येथील पोलीस नाईक ए सी बी च्या जाळ्यात

May 24, 2024


मनमाड – गुन्ह्यात अटक न करता कोर्टात पाठविण्यास मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेतांना लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक कैलास बिडगर हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. पंचांसमक्ष दहा हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये घेतांना ते सापडले.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे डोंगरगाव तालुका निफाड येथील असून शेती व्यवसाय करतात. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 18/5/2024 रोजी गु.र. नंबर 115/2024 कलम 324 504 506 भादवि प्रमाणे दाखल झालेला असून आलोसे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष दहा हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे

लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, 26 वर्षे
आलोसे– कैलास सदाशिव बिडगर, वय वर्षे 42 पोलीस नाईक/1503. नेम – लासलगाव पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक
लाचेची मागणी दिनांक :- 23/05/2024 रोजी
लाचेची मागणी रक्कम :- 10,000/- रुपये,
तडजोडी अंती लाच मागणी करून स्वीकारली दिनांक– 23/05/2024 रोजी
लाच स्वीकारली *- 5,000/- रुपये

लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे डोंगरगाव तालुका निफाड येथील राहणारे असून ते शेती व्यवसाय करतात.त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 18/5/2024 रोजी गु.र. नंबर 115/2024 कलम 324 504 506 भा द वि प्रमाणे दाखल झालेला असून आलोसे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी आहेत. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष 10,000/- रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
▶ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रा)

▶ सापळा अधिकारी
अनिल बडगुजर, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 8999962057

▶ सापळा पथक–
*पोलीस हवा/ संदीप वणवे
*पोलीस शिपाई/ संजय ठाकरे
चालक पो.ना, परशुराम जाधव
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.