loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

Jul 16, 2026



मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य घेऊन 112 वर्षाची शतकोत्तर वाटचाल मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 58 वर्षा पेक्षा जास्त कालावधी पासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि आजच्या सोशल मीडिया च्या काळात त्यांना विविध विषयात लेखन,भाषण करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहर पातळी वर या आंतरशालेय निबंध, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत गत 58 वर्षात हजारो शालेय विध्यार्थी नी सहभाग घेतला आहे यंदाही हिच परंपरा सलग पुढे सुरु ठेवत मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे रविवार दि.19 जुलै 2026 रोजी दुपारी ठीक.3.00 वाजता छत्रे हायस्कुल येथे आंतरशालेय निबंध स्पर्धा -2026 चे आयोजन केले आहे तर शालेय विद्यार्थ्यांन मध्ये भाषण कला,वक्तृत्व कला वाढीस लागावी म्हणून आंतरशालेय कथाकथन स्पर्धा-2026 शुक्रवार दि.31 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक.09.30 वाजता तर आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा-2026 शनिवार दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक.09-30 वाजता सीता लक्ष्मी हॉल, छत्रे हायस्कूल,मनमाड येथे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे विषय व नियमावली चे माहितीपत्रक मनमाड शहरातील सर्व माध्यमिक शाळांना पाठविण्यात आले असून स्पर्धे च्या सहभाग साठीची नावे ग्रंथपाल मनमाड सार्वजनिक वाचनालय यांच्या कडे शाळेमार्फत विद्यार्थ्यांनी नोंदवावी निबंध स्पर्धे साठी नोंदणी ची मुदत रविवार दिनांक 19 जुलै 2026 ला सकाळी 10 वाजेपर्यंत आहे तर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धे साठी शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 ला सायंकाळी 07 वाजे पर्यंत नोंदणी ची मुदत आहे या आंतरशालेय स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना व्यक्तिगत पारितोषिक रोख व पुस्तक /प्रमाणपत्र स्वरूपात देण्यात येईल तसेच या सर्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना सहभाग प्रमाण पत्र देण्यात येईल या स्पर्धेत परीक्षकांन चा निकाल अंतिम राहील आणि तो सर्व स्पर्धकांन वर बंधनकारक राहील वक्तृत्व स्पर्धा झाल्या नंतर लगेच शनिवार दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी त्याच ठिकाणी मान्यवर प्रमुख पाहुणे च्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम सीता लक्ष्मी हॉल छत्रे हायस्कूल येथे करण्यात येईल तरी मोठ्या संख्येने या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा,जेष्ठ संचालक नरेश गुजराथी माजी अध्यक्ष ,प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे,उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, आदींन सह संचालक मंडळाने केले आहे


अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
.