loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात पहीले अर्धशतक

May 25, 2024


मनमाड – सोमवार 24 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 सुपर लीग ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे खेळवल्या जात आहे. नंदुरबार जिल्ह्य़ातून झालेल्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर मनमाड च्या साक्षी शुक्लाला या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या सेक्रेटरी संघाकडुन निवडले गेले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सुपरलीग स्पर्धेसाठी खेळणारी साक्षी ही एकमेव तसेच प्रथम खेळाडु ठरली आहे.
50 षटकांच्या या एकदिवसीय सामण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी 11 संघाकडून खेळताना साक्षीने सामण्यामध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. जालना जिल्हा अंडर 19 संघाविरुध्द खेळताना सामण्यात साक्षीने 62 चेंडुमध्ये 54 धावा जमवल्या ज्यामध्ये 11 चौकार तीने लगावले.
मनमाडमधील या खेळाडुच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर सेक्रेटरी 11 संघाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या आमंत्रिताच्या अंडर 19 ( जिल्हास्तरीय ) सुपरलीग स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय प्राप्त करण्यात यश आले. या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित महिला खेळडुची सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे.

साक्षीच्या या विजयी खेळीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 19 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव युवराज पाटील सर यांनी या खेळाडुला प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.

नांदगाव मतदार संघाचे आमदार श्री. सुहास आण्णा कांदे व भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , दक्ष पाटिल, साहील मोरे , यश रणदिवे , मयुरेश परदेशी , चिराग निफाडकर , रोहित पवार तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.