मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या शालेय क्रिडांगणात लॉन टेनिसबॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.अंतिम सामना विजेता संघास एक्कावन्न हजार रुपये व चषक तसेच उपविजेता संघास एकवीस हजार रुपये व चषक तसेच इतर वैयक्तिक पारितोषीके देण्यात येणार आहे.या स्पर्धेत मालेगाव,मनमाड,धुळे,शहादा असे एकूण 16 क्रिकेट संघानी सहभाग घेतला असून त्यामध्ये नाशिक,भुसावळ,जळगांव या शहरातील नामवंत क्रिकेट खेळाडू सहभागी आहेत .स्पर्धा आयोजनाचे मुख्य कारण म्हणजे मालेगावातील युवा खेळाडूंना गुटखा, पान, तंबाखू आणि धूम्रपान या व्यसनापासून बाहेर काढणे. तसेच आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे. आणि त्यांना एका व्यासपीठावर एकत्र करून खेळा विषयी मार्गदर्शन करून सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणे.या उद्देशाने मालेगाव उच्चमहाविद्यालयाचे प्राचार्य झिया उर रहमान (सर) यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.तसेच माजी रणजीपटू अझहर अन्सारी यांच्या मार्गदर्शखाली स्पर्धा सुरु आहे.त्यांचा मालेगाव येथे जाऊन मनमाड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मनोज ठोंबरे सर, सचिव जाविद शेख सर, कार्यकारी सदस्य परेश (छोटू भाऊ ) राऊत यांनी सत्कार केले
व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.