loader image

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

Jun 18, 2024


गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्या गायकवाड कुटूंबाचे सांत्वन करत आ. सुहास कांदे यांनी रोख रकमेसह सहा महिने पुरेल इतके अन्नधान्य व किराणा देऊन खऱ्या अर्थाने कुटूंब प्रमुखांची भूमिका बजावली.
मयत विलास गायकवाड च्या कुटूंबातील वृद्ध आई – वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, दीड महिन्याची मुलगी असा परिवार आहे. या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजुरी करून पार पाडत होता. मात्र गेल्या आठवड्यात या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यावेळी विलास गायकवाड हा मका लागवड करण्याच्या कामासाठी शेतात जात असताना त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू ओढवला होता.
त्यावेळी आ.सुहास कांदे हे मुंबई ला होते. त्यांनी तातडीने नांदगाव येथे येत खादगाव गाठले. व या अपादग्रस्त गायकवाड कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि मी जी अगदी छोटीशी मदत नम्रपणे करतोय. ती स्वीकारण्याची विनंती या कुटूंबाला केली असता, त्यांनाही गहिवरून आले.
आ.सुहास कांदे यांनी यावेळी सदर गायकवाड कुटूंबाला रोख ५० हजार रुपये, २ क्विंटल धान्य, सहा महिने पुरेल इतका जीवनावश्यक किराणा दिला. आणि या मृत विलास च्या पत्नी ला आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करणे सुलभ व्हावे यास्तव कुठेतरी शिपाई किंवा तत्सम नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलेच, त्याचबरोबर शासकीय ४ लाखांची मदत येत्या आठ दिवसात मिळवून देईन. अन तो धनादेश मी स्वतः घेऊन येईन. असा शब्द ही यावेळी दिला.
याप्रसंगी राजेंद्र पवार, बबलू पाटील,प्रकाश घुगे, किशोर लहाने, अंकुश कातकडे, शाईनाथ गिडगे, सोमनाथ घुगे,मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे,आदीसह शेकडो शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.