नांदगांव :
माहिती अधिकार महासंघाच्या कार्यकर्ता फेडरेशनच्या
नांदगांव तालुका सह प्रचारकपदी अशोक विसपुते रा.जामदरी ता. नांदगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वसवेकर यांचे लेखी नियुक्ती पञ विसपुते यांना प्राप्त झाले आहे .प्राप्त पञात म्हटले की आपणास दिलेले पद हे मानद स्वरूपाचे आहे.आपणास भारतीय संविधान ,भारतीय कायदे,व आपले माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन ची आचरसहिता याचे काटकोर पालन करावयाचे आहे .आपणास पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सर्व सामान्य नागरीकामध्ये समाजामध्ये माहिती अधिकाराचा प्रचार प्रसार करावा अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरशनच्या वतीने करण्यात आली अाहे .विसपुते यांच्या निवडीचे पद नांदगाव तालुक्याला प्रथमच प्राप्त झाले विसपुते यांनी पोस्ट खात्यात आपल्या नावाचा ठसा उमटविला असून कार्य तत्पर असणारे विसपुते यांचे
निवडीचे विविध नामवंतानी अभिनंदन केले आहे .

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...